Recipe by = Vaishnavi Bhandari
Edited by = Kantesh Bhandari
------------------------------------------------------------------------
साहित्य :
१. कोळंबी
२. कांदे - २
3. बटाटा - १
४. टाॅमेटो - २
५. कोथिंबीर
६. मिरची - २
७. आले - १
८. लसूण - ८ पाकळ्या
९. चिंच - १
१०. मिठ (चवीनुसार)
११. तेल - २ चमचे
१२. घरगुती कोळी मसाला
१३. हळद - अर्धा चमचा
१४. गरम मसाला - अर्धा चमचा
-----------------------------------------------------------------------
कृती :
सर्वात प्रथम आपण कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून घ्यावी. एका टोपा मध्ये कोळंबी, टाॅमेटो, मसाला, हळद, चिमुठभर मिठ, घालून 5 मिनिट तसेच ठेवावे. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, मिरची, आले, लसुण, चिंच आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. एका खोलगट भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा टाकून हलका परतावा. परतुन झाल्यावर त्यात आपण वाटण घालावे. नंतर 5 मिनिट ठेवलेली कोळंबी घालावी. व बटाटा टाकून त्याच्यात घरगुती लाल मसाला, हळद, गरम मसाला चवीनुसार मिठ घालून परतावे. कोळंबी व मसाला एकञ झाल्यानंतर त्यात १ ग्लास साधे पाणी घालावे. व त्यावर झाकण देऊन. झाकणावर पाणी ठेवून 10 मिनिटे हळू गॅसवर ठेवावे. 10 मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करावा. आणि गरमागरम झणझणीत कोळंबीचं आंबट भाकरी सोबत वाढावे....
-----------------------------------------------------------------------